अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयाची थेट मदत द्या- श्रीकृष्ण यादव
घनसावंगी प्रतिनिधी :
घनसावंगी तालुक्यात दि.१ सप्टेंबर २०२४ रोजी अतिवृष्टी झाल्याने खरीप हंगामातील सर्व पिकांचे नुकसान झाले आहे शासनाच्या वतीने पंचनामे इतर कामासाठी वेळ न घालवता शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयाची थेट मदत द्यावी अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे
अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हाताशी आलेली सर्व पिके जमीनदोस्त झाली आहे त्यामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत आलेला असून चिंताग्रस्त झालेला आहे
घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फळ पिकांची तसेच ऊस सोयाबीन कपाशी मुग तुर इतर खरीप पिकांची अतोनात नुकसान झाले आहे शासनाने पंचनामे न करता शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी
जेणेकरून अनेक शेतकऱ्यांना बी बियाण्याची कर्ज परतफेड करता येईल असे यात म्हटले आहे
यावेळी निवेदनावर तालुका अध्यक्ष श्रीकृष्ण यादव युवक अध्यक्ष गणेश कदम गणेश काळे साहेबराव वाघ संतोष तौर गजानन जाधव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.