कुंभार पिंपळगाव येथील सात तास वीजपुरवठा खंडित
घनसावंगी:प्रतिनिधी
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव सह परीसरात वीजपुरवठा अचानक खंडीत होण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांपासून वाढले आहेत. सध्या सण उत्सवाचे दिवस तोंडावर असताना वीज पुरवठा खंडीत होण्याचा प्रकार सुरूच आहे.किमान सणासुदीत तरी नागरीकांना वीज मिळणे अपेक्षित आहे.
मात्र कुंभार पिंंपळगाव परीसरात अचानक वीजपुरवठा खंडीत होणे नित्याचेच झाले आहे. कधी दुरूस्तीच्या नावाखाली,कधी बिघाड, तर कधी देखभाल-दुरूस्तीच्या नावाखाली एक तास तर कधी कधी चार तास वीज गुल होत आहे.दरम्यान रविवारी पाऊस सूरु होताच तबल सात तास वीजपुरवठा खंडित होता.
लोंबकळणाऱ्या तारा बनल्या जुनाट…
पावसाळ्यात कुठे तारा तुटणे,झाडांच्या फांद्या वीजवाहिनीवर पडणे,अशा अनेक कारणांमुळे वीजपुरवठा वारंवार खंडीत होतो.हा प्रकार घडू नये म्हणून महावितरणच्या वतीने मान्सूनपूर्व देखभाल-दुरुस्तीची कामे केली जातात. पण थोडा ही पाऊस, वारा आला की वीज गुल होत आहे.
उपअभियंता रिक्त ; कोणीही लक्ष देइना/ अधिकारी पण येईना
कुंभार पिंपळगाव येथील उपअभियंता पद आठ दिवसापासून रिक्त असून नवीन कारभार घेण्यास कोणी तयार नसल्याचे समोर येत आहे. यातच विजेबाबत कोणाला विचारणा करावी असा प्रश्न उपस्थित होत आहे