घनसावंगी तालुका
राजा टाकळी येथे झाड पडून चार मेंढ्या ठार तर १२ मेंढ्या जखमी
जालना :
घनसावंगी तालुक्यातील राजा टाकळी परिसरात दि. २५ एप्रिल मंगळवारी दुपारी अचानक वादळी वारे सह पावसाला सुरूवात झाली या पावसात या वादळीवाऱ्यात घरावरची पत्रे उडाली विजेच्या तारा तुडुन रस्तात पडल्या अनेक ठिकाणी बाभळ लिंबाची झाडे उकळुन पडली मोठमोठी फाटे मोडुन पडल्याने काही ठीकाणी रस्ते बंद झाली.
गेवराई तालुक्यातील ज्ञानेश्वर रतन ठोंबरे हे राजा टाकळी शिवार मेंढ्या चारीत असताना या अचानक अवकाळी पाऊस आल्याने मेंढ्या बाभळीच्या झाडाखाली उभ्या केल्या होत्या यावेळी वारा व पाउस वाढलाने झाड मेंढ्याच्या अंगावर पडून ४ मेंढ्या जागीच ठार झाल्या व १२ मेंढ्या जखमीयात ठोंबरे चे लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. राजा टाकली येथील सखाराम आर्दड यांच्या आखाड्यावरील बाभळ वार्याने मोडुन पडल्याने बैल व गाय किरकोळ जखमी झाले.