औरंगाबाद

भारतीय मुद्रित माध्यमांना चॅलेंज नाही : दयानंद माने


औरंगाबाद : जगभरात ऑनलाइन माध्यमांमुळे मुद्रित माध्यमे अडचणीत आली आहेत. मात्र, भारत हा जगाच्या पाठीवरचा एकमेव देश आहे जेथे ऑनलाइन माध्यमांमुळे मुद्रित माध्यमाच्या विकासाला चालना मिळाली आहे. टिव्हीचा जेंव्हा सर्वसामान्यात वापर वाढला तेंव्हा असे वाटले की, आता पुस्तके कोणी वाचणार नाहीत पण उलटे झाले. रामायण आिण महाभारत या मालिकांमुळे त्यावरील ग्रंथांचा खप प्रचंड वाढला. तसेच वर्तमानपत्राचे आहे. दिवसभर वाहिन्यांवर, युट्युब व पोर्टलवर कितीही बातम्या वाचल्या आणि बघितल्या तरी त्या वर्तमानपत्रात वाचल्याशिवाय वाचनाची भूक भागत नाही.

images (60)
images (60)

विशेष म्हणजे हे आपल्या भारतातच सुरू आहे. त्यामुळे भारतीय मुद्रित माध्यमांना चॅलेंज नाही, असे प्रतिपादन सकाळचे निवासी संपादक दयानंद माने यांनी केले.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या औरंगाबादेतील विभागीय कार्यालयात रविवारी सकाळी त्यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली. या वेळी त्यांनी पत्रकारांशी माध्यमांच्या सद्य:स्थितीवर सविस्तर चर्चा केली. ते पुढे म्हणाले की, मुद्रणकलेचा जनक असे ज्याला संबोधले जाते तो योहानेस गुटेनबर्ग यांनी बुद्धी व अलौकिक चिकाटी यांच्या जोरावर मुद्रणाचे तंत्र शोधून काढले आणि जगातील पहिले छापलेले पुस्तक निर्माण केले, त्या जर्मनीच्या योहान गुटेनबर्ग या महापुरुषाला आपण कदापि विसरू शकत नाही. आजच्या आधुनिक मुद्रण तंत्राचा तो आद्यजनक मानला जातो.

मनुष्याच्या जीवनावर सर्वाधिक प्रभाव पाडणारा शोध म्हणजे मुद्रणकला. गुटेनबर्ग यांनी लावलेल्या या शोधाला, ‘मानव संस्कृतीला जर्मनीने दिलेले महान योगदान’ असे संबोधण्यात आले आहे. त्यांची सर्वोत्कृष्ट मुद्रणकृती अर्थात ४२ ओळींचे बायबल. गुटेनबर्ग बायबल यांच्या आजपर्यंत टिकलेल्या प्रतींपैकी प्रत्येक प्रत लाखमोलाची आहे. गुटेनबर्ग बायबल इतके खास का आहे? गुटेनबर्ग म्युझियमचे भूतपूर्व संचालक हेल्मुट प्रेसर याची तीन कारणे सांगतात. पहिले म्हणजे, पाश्चात्य जगात अक्षरांच्या सुट्या खिळ्यांच्या साहाय्याने मुद्रित केलेले गुटेनबर्ग बायबल हे पहिले पुस्तक होते. दुसरे म्हणजे मुद्रित रूपातले हे पहिलेच बायबल आहे आणि तिसरे असे, की ते अतिशय सुंदर आहे. प्राध्यापक प्रेसर यांनी असे लिहिले की गुटेनबर्ग बायबलमध्ये ‘गॉथिक लेखनशैलीचा सर्वोत्कृष्ट नमुना’ पाहायला मिळतो. गुटेनबर्गचे ते मुद्रणतंत्र ते आजचे वेबमुद्रणतंत्र यात जो बदल झाला आहे तो प्रचंड गतीशिल आणि विकसनशिल आहे. आज माहिती तंत्रज्ञानामुळे वृत्तपत्राचे रुप पालटून गेले आहे आणि ते वाचकांना आकर्षित करीत आहेत, असे शेवटी माने म्हणाले.


सायंकाळची आरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सुहास दासरथे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी मनसेचे शहराध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, गजन गौडा पाटील, आशिष सुरडकर, संदीप कुलकर्णी, विराळे पाटील, एच.आर. लहाने, राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रभू गोरे, संघटक विलास शिंगी, उपाध्यक्ष छब्बुराव ताके, प्रसिद्धीप्रमुख संजय व्यापारी, मनोज पाटणी, कोषाध्यक्ष मुकेश मुंदडा, किरण हरदे पाटील, अनिल कुलथे, सुरज दहिफळे आदींची उपस्थिती होती.
आजच्या आरतीचे मान्यवर
श्री गणेशाची सोमवार दि.13 रोजीची सकाळची आरती शिवसेना नेते चंद्रकांत खैरे तर सायंकाळची आरती मनसेचे जिल्हा संघटक बिपिन नाईक यांच्या हस्ते होणार आले, तरी पत्रकार बांधवांनी या आरतीच्या पावनप्रसंगी उपस्थित राहावे, अशी विनंती संघाच्या ‌वतीने करण्यात आली आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!