औरंगाबाद

वसंत मुंडे राज्यातील पत्रकारांचे ‘कार्यसम्राट’ नेतृत्व मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघाचे
अध्यक्ष प्रमोद डोईफोडे यांचे प्रतिपादन

वसंत मुंडे राज्यातील पत्रकारांचे ‘कार्यसम्राट’ नेतृत्व !

images (60)
images (60)
  • मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघाचे
    अध्यक्ष प्रमोद डोईफोडे यांचे प्रतिपादन छत्रपती संभाजीनगर : ( प्रतिनिधी)
    ग्रामीण पत्रकारांचे प्रश्न समजून घेऊन शासन स्तरावर पाठपुरावा करणारे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे हे महाराष्ट्रातील पत्रकारांचे कार्यसम्राट नेतृत्व आहे, असे प्रतिपादन मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाचे नुतन अध्यक्ष प्रमोद डोईफोडे यांनी केले. ग्रामीण भागातील पत्रकारांना अर्थीक पातळीवर सक्षम करण्यासाठी यापुढे मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघही राज्य पत्रकार संघाबरोबर समन्वयाने काम करेल अशी ग्वाही त्यांनी दिली.
    महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय कार्यालयात मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रमोद डोईफोडे यांचा संपादक धनंजय लांबे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे होते. तर मंत्रालयातील जेष्ठ पत्रकार चंदन शिरवळे, विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी, संभाजीनगर जिल्हाध्यक्ष प्रभू गोरे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबा श्रीहरी देशमाने, यांची प्रमुख उपस्थिती होती. सत्काराला उत्तर देताना प्रमोद डोईफोडे म्हणाले, शहरी आणि ग्रामीण भागातील पत्रकारांचे प्रश्न वेगवेगळे आहेत. ग्रामीण पत्रकारांचे प्रश्न समजून घेऊन मंत्रालय स्तरावर प्रश्नांचा पाठलाग करणारे वसंत मुंडे महाराष्ट्रातील पत्रकारांचे सक्षम कार्यसम्राट नेतृत्व आहे. व्यापक जनसंपर्क आणि कोणताही प्रश्न हाती घेतला तर तडीस लावण्याची वृत्ती त्यांच्या अंगी आहे. ग्रामीण भागातील पत्रकारांमुळेच सर्वसामान्य माणसाच्या समस्या शासन दरबारी पोहोचतात. त्यामुळे ग्रामीण भागातील पत्रकार आर्थिक पातळीवर सक्षम असला पाहिजे यासाठी यापुढे मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघ राज्य पत्रकार संघाबरोबर समन्वने काम करून राज्यातील पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेईल.
    प्रसंगी न्याय मागण्यासाठी आंदोलन उभे करू, अशीही ग्वाही ही प्रमोद फोईफोडे यांनी दिली.तर संपादक धनंजय लांबे यांनी ग्रामीण भागातील पत्रकारांच्या समस्या शासन दरबारी सोडवण्यासाठी मंत्रालय वार्ताहर संघाची साथ महत्वपूर्ण राहील. वृत्तपत्रांचे अर्थकारण आणि पत्रकारांच्या समस्या यावर राज्यभर अधिवेशन घेऊन शासन दरबारी आणि सामाजिक पातळीवर या विषयाला वाचा फोडण्याचे काम वसंत मुंडे यांनी केले आहे. त्यांच्या भूमिकेमुळे वृत्तपत्र क्षेत्रात काम करणाऱ्यांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे मतही लांबे यांनी व्यक्त केले.यावेळी मराठवाडा विभागातील पदाधिकारी, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघ ग्रामीण पत्रकारांच्या पाठीशी : चंदन शिरवाळे

यावेळी मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघाचे माजी अध्यक्ष चंदन शिरवाळे म्हणाले, वसंत मुंडे यांच्या रूपाने महाराष्ट्राला खराखुरा पत्रकारांचा नेता मिळाला आहे. कुशल संघटक आणि धडाडीने काम करण्याची वृत्ती मुंडे यांच्या ठायी आहे. पत्रकारांच्या वैयक्तिक, सार्वजनिक प्रश्नांवर तळमळीने काम करतात. दहा वर्षांपासून मी त्यांना जवळून अनुभवले आहे, त्यांच्यात प्रश्न सोडण्याची व माणसे जोडून ठेवण्याची अद्भूत कला आहे.आता पत्रकारांच्या घरांसाठी मुंडे यांनी भविष्यात महाराष्ट्रव्यापी काम उभे करावे, त्यांच्या हातून पत्रकारांचे कल्याण व्हावे, मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघ ग्रामीण पत्रकारांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे, अशी ग्वाही शिरवाळे यांनी दिली.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!