गोळेगाव येथील खंडीत वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी
बीड प्रतिनिधी / गोपाल चव्हाण
जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गोळेगाव येथे जातेगाव येथील तेहतीस केव्ही उपकेंद्र अंतर्गत वीज पुरवठा केला जातो परिसरांत सर्वत्र वीज आहे मात्र लाईनमन आणि सहाय्यक अभियंता यांच्या गलथान कारभारामुळे गावात अर्ध गाव अंधारात आहे.
वीजबिलाचे कारण दाखवत तसेच रोहित्र ना दुरुस्ती, केबल जळणे आणि इतर कामे दाखवत आर्ध गाव जाणून बुजून अंधारात असल्याने गावकऱ्यांना मोठी गैरसोय होत आहे तात्काळ वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी ग्रामस्थाने दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे
सविस्तर वृत्त असे की,गेवराई तालुक्यातील गोळेगाव येथे आर्ध गाव जाणीवपूर्वक अंधारात ठेवले जात आहे रोहित्र ना दुरुस्ती केबल जळणे, तारा तुटणे ही कारणे दाखवत आणि वीजबिल भरण्याची सक्ती करत सहाय्यक अभियंता व लाईनमन यांनी गावातील वीजपुरवठा खंडीत केला आहे गावकऱ्यांनी या परिस्थितीचे भान राखून काही प्रमाणात वीजबिलही भरले आहेत तरीही सहाय्यक अभियंता व लाईनम यांनी गावकऱ्यांना वेठीस धरत वीजपुरवठा सुरळीत करीत नाहीत कित्येक दिवसापासून गाव अंधारात असल्याने नागरिकांना पावसाळ्यात अतोनात हाल होत आहेत यामुळे गोळेगाव येथे वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी गावकऱ्यांनी दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.