पुल अखेर श्री क्षेत्र उक्कडगाव-गोपत पिंपळगाव नदीपात्रातच होणार! कल्याणराजे तौर यांच्या हस्ते बोअर टेस्टिंग कामाचे उद्घाटन
घनसावंगी प्रतिनिधी / नितीन राजे तौर
घनसावंगी तालुक्यातील श्री क्षेत्र उक्कडगाव-गोपत पिंपळगाव ता गेवराई जि बीड येथील गोदावरी नदीवरील पूल बांधकामासाठी कल्याणराव राजे तौर ठाकुर यांच्या हस्ते टेस्टीग बोर घेऊन सुरुवात करण्यात आली.
घनसावंगी तालुक्यातील श्री क्षेत्र (उत्तरेश्वर महादेव) उक्कडगाव गोदावरी नदीपात्रात होणारा पूल गेवराई तालुक्याचे आमदार लक्ष्मण पवार यांच्या विशेष सहकार्याने श्री क्षेत्र उत्तरेश्वर महादेवाचे हेमाडपंती मंदिर असलेल्या उक्कडगाव ता घनसावंगी व गोपत पिंपळगाव ता गेवराई जि बीड या ठिकाणी होणार असे निश्चित असताना परीसरातून ओढाओढ होत होती मात्र अखेर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली गेवराई तालुक्याचे आमदार लक्ष्मण पवार यांच्या प्रयत्नाने उक्कडगाव येथे पुल होणार हे निश्चित झाल्यानंतर उक्कडगाव येथिल कल्याणराजे तौर ठाकूर यांच्या हस्ते गोपत पिंपळगाव साईडवर बोअर घेऊन या कामाचे उद्घाटन करण्यात आले आहे.
यामुळे जालना व बीड जिल्ह्यातील वाहतुकीसाठी व दोन जिल्ह्यासाठी हा पुल खूप महत्त्वाचा ठरणार असुन बीड जिल्ह्यातील 222 हायवे ला जोडला जाणार आहे गोदावरी नदीच्या दुतर्फा असलेल्या गावांना रस्त्याच्या अडचणीला सामोरे जावे लागत असून या गावांना खूप मोठा दिलासा मिळणार असल्याने पंचक्रोशीतील ग्रामस्थांतुन समाधान व्यक्त केले जात आहे.
यावेळी गेवराई चे युवा नेते शाम बापु पवार, शिवराज दादा पवार,यहीय्या खान, सजय दादा तौर, मा सभापती रघुनाथ तौर, मा सभापती सतिश बप्पा पवार,सय्याजी पवार,शैलराजे भैय्या तौर, गोविंद तौर, राहुल तौर, भगवान तौर, अशोक तौर, सतिश तौर , गोपाल भैय्या चव्हाण,सुदाम आर्दड, योगेश तौर,इंजिनिअर मौदड साहेब, आदी उपस्थित होते