शहागड येथे सशस्र दरोडेखोरांनी लुटली बुलढाणा अर्बन बँक
25 लाख रोख रकमेसह 1 कोटीचे तारण ठेवलेला सोन्यावर केला हाथ साफ
बबनराव वाघ/उपसंपादक
शहागड (ता.अंबड) येथील बुलढाणा अर्बन बँकेत तीन दरोडेखोरांनी फिल्मीस्टाईलने धुडगूस घालत बंदुकीच्या नोकेवर पंचवीस लाख रोख रक्कम; तर अंदाजे एक कोटी पेक्षा जास्त रुपयांचे सोन्याचे दागिने पळवल्याची घटना आज सायंकाळी पाच वाजेदरम्यान घडली.
तीन बंदूकधारींनी घातला सशस्त्र दरोडा; शहागडमध्ये खळबळ, बुलढाणा अर्बन बँकेतून लुटले सव्वा कोटी रुपये, रोख २५ लाख रकमेसह दरोडेखोरांनी लुटले कोटींचे सोने, शहागड गावातील औरंगाबाद- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील घटना, अप्पर पोलीस अधिक्षक विक्रांत देशमुख यांची दरोड्या ठिकाणी भेट, श्वानपथक व ठसे तज्ञ घटनास्थळी दाखल.
बुलढाणा अर्बन बँक पाच वाजता बंद होत असते.
गुरुुुवारी आठवडी बाजाराचा दिवस; ऊसाचे वाढबील, सणासुदीचे दिवस असल्याने, बँकेत तारण ठेवून कर्ज प्रकरणे केलेले कर्जदार, शेतकरी, दिवसभराच्या धामधुम आटोपून सायंकाळी पावणे पाच वाजता बँक बंद करण्याची वेळ, त्यामुळे बँकेत सामसूम, आणि फक्त सात जणांचा कर्मचारी स्टाप
कर्मचारी आपापल्या कामात असतांना गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजेदरम्यान तीन अज्ञात दरोडेखोरांनी मुख्य दरवाजातून बँकेत प्रवेश केला.काही कळण्याच्या आत तिन्ही दरोडेखोरांनी आपापले बंदूक काढून कर्मचाऱ्यांवर रोखून धरले.व त्यांना तुमचे मोबाईल कुठं आहेत, चला इकडं घ्या, असे म्हणत मोबाईल ताब्यात घेतले. शाखा व्यवस्थापक गणेश कापरे यांना बंदुकीचा धाक दाखवून लाॅकरची चावी घेतली. तद्नंतर सर्व कर्मचारी शाखा व्यवस्थापक गणेश कापरे, कॅशिअर प्रमोद पुंड, लिपीक निखिल जावळे, विकास बांगर, सिध्दार्थ इंगळे, शिपाई निवास चव्हाण, इनुस सय्यद सात कर्मचाऱ्यांना स्ट्राॅग रुममध्ये कोंडले.आणि बंदुकीच्या नोकावर बँक कर्मचारी समोर दोन लॉकर मधील ग्राहकांनी तारण केलेले सोने, तसेच पंचवीस लाख रुपयांची रोख रक्कम पाठीवर असलेल्या काळ्या रंगाच्या बॅगेत भरुन पसार झाले.तिन्ही चोरटे बँकेच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
बँकेत दरोडा पडल्याची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरताच नागरिकांनी बँकेत एकच गर्दी केली होती.तर बँक कर्मचारी दहशतीखाली दिसून येत होते.कर्मचाऱ्याचे हात पाय कपात होते, काही कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले होते.कुणाला काय बोलावे कर्मचाऱ्यांना सुचेनासे झाले होते.दरोडेखोरांनी पोबारा करताच बँकेतील कर्मचाऱ्यांनी जवळपासच्या नागरिकांना संपर्क केला.
घटनेची माहिती गोंदी पोलीसांना मिळताच शहागड व गोंदी पोलिसांनी चोरट्यांचा पाठलाग करत माग काढण्याचा प्रयत्न केला.गेवराई, बीड, जालना, औरंगाबाद, पैठण येथील पोलिसांना कळवून त्या त्या मार्गावर नाकेबंदी करण्याच्या सुचना केल्या होत्या.शर्थीचे प्रयत्न करूनही दरोडेखोरांचा माग लागला नाही.दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले.
दरम्यान या झालेल्या औरंगाबाद- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील रहदारीच्या रस्त्यावर दिवसाढवळ्या दरोड्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
या बँक दरोड्यात जवळपास २५ लाख रुपये रोख रक्कम, व पंचक्रोशीतील ग्राहकांचे तारण ठेवलेले दहा कोटींचे सोने त्यातून (अंदाजे 1 कोटीच्या घरात) सोने दरोडेखोरांनी लुटले असल्याचे बँकेच्या स्थानिक व्यवस्थापनाने सांगितले.
सायंकाळी सात वाजे दरम्यान अप्पर पोलीस अधिक्षक विक्रांत देशमुख यांनी दरोडा स्थळी पाहणी केली, तद्नंतर श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते.
राष्ट्रीय महामार्गावरील, शहागड बसस्थानक, व्यावसायिक गाळे आदीं ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत दरोडेखोरांचा माग काढण्याचा प्रयत्न केला.