औरंगाबाद
रोहिणी लोखंडे पवार यांचे यश

औरंगाबाद/-
म. रा. म. पत्रकार संघांचे भोकरदन तालुकाध्यक्ष रवी लोखंडे यांची कन्या तथा औरंगाबाद येथील शिव छत्रपती कॉलेजच्या संगणक विभागाच्या प्राध्यापक रोहिणी लोखंडे पवार यांनी भौतिकशास्त्र विषयाच्या एम. एस. सी. च्या दुसऱ्या सेमिस्टर मध्ये 86%गुण मिळवून घावघवीत यश संपादन केले. या अगोदर त्यांनी संगणकशास्त्रात एम. एस. सी. अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे
सौ. पवार यांच्या यशाबद्दल त्यांचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आ. संतोष दानवे,औरंगाबाद जि. प. माजी अध्यक्ष प्रा. द्वारकाभाऊ पाथरीकर,केळना, अजिंठा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बी. एम. लोखंडे, भिलदरी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. डॉ.सुखदेव मांटे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरानी अभिनंदन केले.