कृउबा समिती निवडणूक:शिवसेना शिंदे गटाचा भाजप-सेना युतीला पाठिंबा
माजी जि.प.सदस्य शाम उढाण यांची माहिती
कुंभार पिंपळगाव :कुलदीप पवार
घनसावंगी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी राज्यमंत्री तथा शिंदे गटाचे उपनेते अर्जुनराव खोतकर व संपर्कप्रमुख पंडित भुतेकर यांच्या सुचनेनुसार भाजप-शिवसेना (ठाकरे गट) युतीच्या उमेदवारांना पाठिंबा दर्शविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे शाम उढाण यांनी बुधवारी (ता.२६) आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
पुढे बोलतांना श्री.उढाण म्हणाले की,घनसावंगी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अठरा संचालक पदाच्या जागांसाठी शुक्रवारी (ता.२८)
रोजी मतदान प्रक्रिया होत आहे.या निवडणुकीत भाजप-शिवसेना (ठाकरे गट) च्या परीवर्तन शेतकरी विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना छत्री या निशाणी समोरील बटण दाबून प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन श्री.उढाण यांनी केले आहे.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अँड.विनोद तौर,तालुकाप्रमुख बापुसाहेब आर्दड,तात्यासाहेब चिमणे,
अँड.नितेश उढाण,कालीदास राऊत,भाऊसाहेब जाधव,महादेव खोतकर,चंद्रकांत बहीर,अप्पासाहेब कंटुले,गणेश नाईकनवरे,उद्धव कोरडे यांची उपस्थिती होती.