घनसावंगी तालुकाजालना जिल्हा
कुंभार पिंपळगाव येथील अखंड हरीनाम सप्ताहाची सांगता

कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे मागील गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या अखंड हरीनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता आज (दि.3) गुरूवार रोजी सकाळी ह.भ.प.केशव महाराज उखळीकर यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली.
यावेळी ह.भ.प.केशव म.उखळीकर यांनी श्रीकृष्ण आणि गोपिकेचा विस्तृत वर्णन उपस्थित भाविकांसमोर निरूपण करताना मांडले.त्यानंतर दहीहंडी फोडून महाप्रसाद वाटपाने सप्ताहाची सांगता करण्यात आली. यावेळी ग्रामस्थासह महिला, पुरुष पंचक्रोशीतील गायक,वादक,गुणीजन भजनी मंडळी यांच्यासह भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.आयोजित महाप्रसादाचा असंख्य भाविकांनी लाभ घेतला.