धनादेश अनादर प्रकरणी कर्ज थकबाकीदारास १ महिन्यांचा कारावास;धनादेशाची दुप्पट रक्कम जमा करण्याचे आदेश
न्यूज जालना/प्रतिनिधी
देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित औरंगाबाद यांच्या कडुन गेवराई तांडा येथील श्री विजय छगन राठोड यांनी दि २७ डिसेंबर २०१० रोजी ५१ हजार रुपये कर्ज घेतले होते.ते कर्ज परत फेड म्हनुन सदर व्यक्ति ने दि २० एप्रिल २०१२ रोजी संस्थेस चेक क्रमांक ०६५४०३औ जि म स शाखा शहागंज औरंगाबाद चा रुपये ३४ हजार ५०६ चा धनादेश दिला. परंतु रक्कम खात्यावर शिल्लक नसल्या कारणाने धनादेश परत आला होता.म्हनुन संस्थेने सदर व्यक्तिस विधिज्ञ श्री वाय.के.जाधव यांच्या मार्फत थकबाकीदारास नोटीस पाठवून सुद्धा थकबाकिदाराने दिलेल्या नोटीसला महत्व दिले नाही. व म्हनुन संस्थेने सदर व्यक्ति विरुद्ध औरंगाबाद न्यायालयात
विधिज्ञ वाय. के.जाधव यांच्या मार्फत कलम १३८ खाली धनादेश अनादर प्रकरणी फिर्यादि संस्थेने विधीअधिकारी श्री ए.के.सुलताने यांच्या वतीने न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला होता न्यायालयात लागणारी कागद प्रत्राची पुर्तता व साक्ष आधारे दोन्ही पक्षकारांचे अंतिम युक्तीवाद होऊन मा.८ वे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री आर.व्ही.सपाटे साहेब या न्यायालयाने दोषी धरून कलम १३८ पराक्रम अधिनियम या अंतर्गत थकबाकीदारास १ महिने कारावास व धनादेशाच्या दुप्पट रक्कम रुपये ६९,०१२ रुपये दंड देण्याचे सक्त आदेश देण्यात आले आहेत संस्थेच्या बाजुने विधिज्ञ श्री वाय.के. जाधव व विधिज्ञ श्री आर.व्ही.कुंटे व त्यांचे सहकारी यांनी काम पाहिले .