फ्लाइट पकडण्यासाठी तरुणीचा कहर; केवळ Bikini घालून विमानतळावर मारली एन्ट्री, पाहा VIDEO
वॉशिंग्टन: आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींना स्वीमिंग पूल किंवा सुट्ट्य़ांमध्ये बीचवर बिकनीमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतानाचे सोशल मीडियावर फोटो पाहिले असतील. पण विचार करा जर विमानतळावर एखादी महिला बिकनीमध्ये आली तर काय होईल? सर्वजण हा काय प्रकार पाहात राहातील. असाच एक अजब प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की विमानतळावर एक महिला बिकनी घालून पोहोचली आहे. तिच्यासोबत एक तरुण बॅग घेऊन जात असल्याचं दिसत आहे. विमानतळावर ती चेकइन करायला आली आहे. बिकनीमध्ये आलेल्या या महिलेनं विमातळावरील काही लोकांचं लक्ष वेधून घेतलं. बिकनीमध्येच महिला विमानात बसण्याच्या तयारीत होती.
डेली मेलनं दिलेल्या वृत्तानुसार हा व्हिडीओ अमेरिकेतील मियामी विमानतळावरचा आहे. या व्हिडीओमध्ये महिलेनं हिरव्या रंगाची बिकनी घातली आहे. तर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कॅप्शनमध्ये तिने मास्क घातला हेच खूप असल्याचं युझरनं म्हटलं आहे.
https://www.instagram.com/p/CTVUU8-J1bc/?utm_medium=copy_link
या व्हिडीओमध्ये महिला तर अशी रिअॅक्ट करत आहे जसे काही घडलेच नाही. तिला काही कशाचा फरक पडत नाही. ती आरामत चेकइन करण्यासाठी जात आहे. तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी मात्र तिचा व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर शेअर केला. ‘Humans of Spirit Airlines नावाच्या इन्स्टा अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला.
या व्हिडीओवर अनेक कमेंट्स येत आहे. जेव्हा तुम्ही दुपारी पूल पार्टी करत असता आणि त्याच वेळी तुम्हाला संध्याकाळी 4 चं विमान पकडायची घाई असते. असं कॅप्शन देऊन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे किंवा या महिलेचं नाव अजूनतरी समोर आलेलं नाही.
(सूचना: न्यूजजालना या व्हिडीओची पुष्टी करत नाही. हा व्हिडीओ व्हायरल आहे.)