बदनापूर तालुक्यातील दावलवाडीत पावर ग्रीड कंपनीचे 1200 के.व्हीचे काम चालू असणारे टॉवर कोसळले
बदनापूर प्रतिनिधी/ किशोर सिरसाट
बदनापूर ता:(18 ):
बदनापूर तालुक्यातील दावलवाडी शिवारामध्ये गट क्रमांक 107 तेजराव अंभोरे यांच्या शेतामध्ये पावर ग्रेड कंपनीचा टावर 1200 के.व्ही कोसळला जीवितहानी टाळली समृद्धी महामार्गाचे काम चालू असताना टावरची उंची वाढण्याचे काम सुरू होते.
या दरम्यान दिनांक 18 रोजी सकाळी 03: 00 सुमारास टावर पडल्याची माहिती मिळाली अति तानाचा भार आल्याने ही घटना घडल्याची माहिती कंपनीचे अधिकारी बी.के वर्मा यांनी दिली.
हा प्रकार घडल्याने जीवित हानी टाळली मात्र आजूबाजूच्या शेतकऱ्यांचं पिकाचं अतोनात नुकसान झाले.
आज सकाळी सात वाजता पावर ग्रेडचे कॉन्ट्रॅक्टदार व आधीकरी यांना ही माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन टावर ची पाहणी केली असता बाजूला समृद्धी महामार्ग हा पाचशे मीटर अंतरावर जात आहे.
नवीन टावरचे काम सुरू असताना हा प्रकार घडलेला आहे असा अंदाज कंपनी आधिकारी बी.के वर्मा यांनी अशी माहिती दिली.
तातडीने काम वेगणे वाढून काम पूर्ण केल्या जाईल असे सांगण्यात आले..